राहुल सोनवने गळफास घेऊन आत्महत्या

Foto
घाटी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत घोषित

माळीवाडा प्रतिनिधी :   रामपुरी तालुका छत्रपती संभाजीनगर  येथील राहुल सोमीनाथ सोनवणे (वय १९) या युवकाचा मृत्यू झाल्याची घटना २२ ऑक्टोबर रोजी घडली. राहुल हा रामपुरी येथील रहिवासी होता. २२ ऑक्टोबर रोजी सायंकाळी सुमारे ४.४५ वाजता तो राहत्या घरी गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला.

त्याला प्रथम उपचारासाठी दौलताबाद येथील शासकीय रुग्णालयात नेण्यात आले. त्यानंतर पुढील उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (घाटी) दाखल करण्यात आले. मात्र, तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सायंकाळी ६.१५ वाजता तपासून त्याला मृत घोषित केले. 

या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली., पुढील तपास दौलताबाद पोलिस उपनिरीक्षक बाळासाहेब आहिरे करीत आहे.